प्रभाग क्रं ६ मधील सर्व नागरीकांची आरोग्य तपासणी करा ; नगरसेवकांची मागणी

धरणगाव, प्रतिनिधी । प्रभाग क्रं ६ मध्ये कोरोना पाँझिटिव्ह रूग्णाची.संख्या १५ ते १६ झाली असुन.नागरिक भयभीत झाले आहेत. तरी या परीसरातील नागरीकाची आरोग्य विभागा मार्फत तपासणी करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका सौ संगिता मराठे व नगरसेवक ललित येवले तसेच गुलाब मराठे यांच्या कडुन भेट घेऊन निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

धरणगावातील प्रभाग क्र. ६ मधील वाणी गल्ली, बालाजी रोड, भंडगपुरा, पारधी वाडा, मराठे गल्ली, हनुमान नगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका सौ. संगीता मराठे, नगरसेवक ललितभाऊ येवले यांनी केली आहे. संपूर्ण परीसरात नगरसेवक यांच्या कडुन असैनिक अल्बम ३० ह्या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप प्रभागात करण्यात आले . उर्वरित परीसरातही गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे व कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण. परीसरात निर्जंतुक फवारणी नगर पालीकेमार्फत दोन वेळा करण्यात आली आहे. तसेच परिसर सील करण्यात आला आहे.

Protected Content