धक्कादायक : धरणगावात आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली असून या वृत्तास नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

शहरातील बालाजी मंदिर परिसरातील एका कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोन जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. या दोघांचे रिपोर्ट शुक्रवारी रात्री  पॉझिटिव्ह आले आहेत. यातील एक अहवाल आधीच्या रुग्णाच्या पत्नीचा आहे.  प्रशासनाने आधीच रुग्णांचा रहिवास असलेला परिसर सील केला आहे. तालुक्यातील रुग्णसंख्या आता २७ वर पोहचली असून कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता धरणगाव शहरात रविवार दिनांक ७ जूनपासून पाच दिवसांचा स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून नागरिकांना याचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन व व्यापारी महामंडळाने केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content