जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील बर्धमाननगरात मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करात दाम्पत्याला चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटनासमोर आली आहे. यात महिलेच्या अंगावारील सोन्याचे दागिने जबरी हिसकावून लूट केली आहे. या घटनेबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसंत शंकर चव्हाण रा. बोदवड रोड, वर्धमान नगर, जामनेर हे आपल्या पत्नी कलाबाई सह वास्तव्याला आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी १ एप्रिल रोजी रात्री कुटुंब जेवण करून झोपलं होतं. मध्यरात्री गाढ झोपेत असतांना दोन अज्ञात दरोडेखोर तोंडाला काळे मास्क लावून चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरले. घरात शिरण्यापुर्वी दरोडेखोरांनी शेजारच्या घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावण्यात आली होती. घरात शिरताच वसंत चव्हाण हे जागे झाले. त्यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार केल्यानंतर यातील एकाने त्याच्या चाकूने वार करून लोखंडी रॉड डोक्यात टाकला. तर त्यांची पत्नी कलाबाई याच्या गळ्यातील ६ ग्रॅमची सोन्याची पोत आणि कानातील सोन्याच्या वस्तू जबरी हिसकावली. यावेळी आवाज आल्यामुळे शेजारी राहणारे नागरीका जागे झाल्याने दरोडेखोरांनी धुम टोकली. याप्रकरणी रविवारी २ एप्रिल रोजी वसंत चव्हाण यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. श्वान पथकाच्या माध्यमातून पुढील चौकशीला सुरूवात केली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कनरण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहे.