‘द कपील शर्मा शो’च्या विरोधात सर्व शक्ती सेनाच्यावतीने निवेदन (व्हिडीओ)

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘द कश्मीर फाईल’ चित्रपटाच्या प्रमोशन करण्यास नकार देणाऱ्या ‘द कपील शर्मा शो’च्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शक्ती सेनाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘द काश्मीर फाइल्स’ लवकरच चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना आता ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये त्यांचा चित्रपटाचे प्रमोशन करायचे होते. परंतु कपिल शर्माने विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. यामुळे जळगाव शहरातील सर्व शक्ती सेना या संघटनेच्या वतीने ‘कपिल शर्मा शो’ला विरोध करण्यात आला. कपिल शर्माला महाराष्ट्र राज्यात फिरू देणार नसून त्याच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत शुक्रवार ११ मार्च रेाजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी सर्व शक्ती सेनाचे सचिव छत्रभुज सोनवणे, प्रभारी जळगाव जिल्हाध्यक्ष मयूर कोळी, ॲड. नितेश महाजन, सुभाष डागा, जिजाबराव पाटील, प्रदीप पानपाटील, विकास सपकाळे, कृष्णा सावळे, राजेंद्र पाटील, धनराज कोळी, दीपक चौधरी, विजय तायडे, गजानन काडेले, प्रा. सुभाष सपकाळे, संदीप गाडे, दीपक वानखेडे, दीपक तायडे, उमेश तायडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1185510791981686

 

Protected Content