पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील जळांद्री येथील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून २ लाख रूपयांची मागणी करत चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील जळांद्री येथील माहेर असलेल्या सोजर रामधन बांभुळकर (वय-२७) यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील जनुना येथील रामधन गोवर्धन बांभुळकर यांच्याशी रितीरिवाजानुसार एप्रील २००८ मध्ये झाला. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती रामधन बांभुळकर याने विवाहितेला रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे अशी मागणी, दरम्यान विवाहितेने पैशांची पुर्तता न केल्याने तिला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर सासू, दीर, नणंद, नंदोई यांनी देखील शरिरीक व मानसिक त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. मंगळवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती रामधन गोवर्धन बांभुळकर, सासू रेखा गोवर्धन बांभूळकर, दीर आकाश गोवर्धन बांभूळकर, नणंद पुनम सोपान मराठे, नंदोई सोपान कृष्णा साठे सर्व रा. जनुना जि.बुलढाणा यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिनेश मारवडकर करीत आहे.