दोन बँकांच्या कर्ज व्याज दरात कपात

मुंबई  वृत्तसंस्था ।  इंडियन ओव्हरसीज बँकेने एमसीएलआर ०.१० टक्के कमी करण्यात येत असल्याचे सोमवारी जाहीर केले. नवा कर्जदर १० सप्टेंबरपासून लागू केला जाणार आहे. यामुळे बँकेचा एक वर्षे मुदतीच्या एमसीएलआर कर्जांचा दर आता ७.६५ टक्क्यांवरून ७.५५ टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे तीन महिने व सहा महिने मुदतीच्या एमसीएलआर कर्जांचा दर ७.५५ वरून ७.४५ टक्के करण्यात आला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रनेही (महाबँक) एक वर्ष मुदतीच्या एमसीएलआर कर्जांचा दर ७.४० वरून ७.३० टक्के केला आहे. सहा महिने मुदतीच्या एमसीएलआर कर्जांसाठी आता ७.३० ऐवजी ७.२५ टक्के दर लागणार आहे. पंधरा दिवस, एक महिना व तीन महिने मुदतीच्या एमसीएलआर कर्जांसाठी अनुक्रमे ६.८०, ७ व ७.२० टक्के दर लागू केला जाणार आहे.

कोरोना संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी RBIकडे आणखी उपाय योजना आहेत. भविष्यात देखील व्याज दरात कपात केली जाईल, असे संकेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकताच दिले होते. व्याज दरात कपात असो किंवा अन्य उपाय योजना; आमच्या भात्यातील बाण अजून संपले नाहीत, अशा शब्दात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भविष्यातील धोरणांचे संकेत दिले होते .

Protected Content