दोघांकडून तरूणाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आसोदा रेल्वे गेटजवळ काहीही कारण नसतांना दोन जणांनी एकाला बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात जड वस्तू टाकून दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुकयातील आसोदा येथील वाल्मिक नगरात समाधान डिगंबर सोनवणे हा तरुण वास्तव्यास आहे. सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजता हा तरुण असोदा रेल्वेगेटजवळ उभा असतांना तयांच्या गावातील मयूर सपकाळे व महेंद्र रायसिंगे यांनी काहीही कारण नसतांना समाधानला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या डोक्यात जड वस्तू मारुन त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी समाधान सोनवणे यांच्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात मयूर विजय सपकाळे (वय-२२) व महेंद्र अशोक रायसिंगे (वय-२३, दोघे रा. असोदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास किरण वानखेडे हे करीत आहे.

 

Protected Content