रेशन घोटाळ्याच्या चौकशीबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात रेशन दुकानदार व अधिकारी यांचे संगनमताने चाललेल्या घोटाळ्यांची त्वरीत चौकशी करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात रेशन माल व दुकानदारांनी केलेल्या घोटाळ्याबाबत यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रेशन दुकानदार आणि अधिकाऱ्यांच्या नावाने निवेदन देण्यात आले होते. परंतू जिल्हा प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि रेशनदुकानदार यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. एका रेशनकार्डात ६ नावे असल्यास त्यापैकी केवळ ४ जणांना धान्य वाटप केले जात आहे व उर्वरित दोन जणांचे धान्य काळ्या बाजारात विक्री केले जात आहे. रेशनधारकांना १२ अंकी आकडा मिळविण्यासाठी अधिकारी नागरीकांना वेठीस धरून पैशांची मागणी केली जात आहे. यामुळे गरजू व्यक्ती लाभापासून वंचीत राहत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकारी व रेशनदुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना देण्यात आले.

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक लाडवंजारी, रिंकू चौधरी, इब्राहिम तडवी, भगवान सोनवणे, किरण राजपूत, राजू मोरे, रहिम तडवी, जितेंद्र बागरे, संजय जाधव, सुशिल शिंदे विशाल देशमुख डॉ. रिजवान खाटीक, अमोल कोल्हे यांच्यासह आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content