गोदावरी अभियांत्रीकीत अभियंता दिन साजरा

जळगाव प्रतिनिधी | गोदावरी अभियांत्रीकी महाविद्यालयात आज अभियंता दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

सर मोक्षगुंडम विश्‍वसरैया यांच्या जयंतीला अर्थात १५ सप्टेंबर रोजी दरवर्षी अभियंता दिन साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून आज गोदावरी  अभियांत्रीकी महाविद्यालयात ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला फाऊंडेशन ब्रेक मॅन्युफॅक्चरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डेप्युटी मॅनेजर शामकांत पाटील आणि प्राचार्य व्ही. एच. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमात रोशनी पाटील, वर्षा पाटील, नरेंद्र महाजन, हर्षल परदेशी या विद्यार्थ्यांनी सर मोक्षगुंडम विश्‍वसरैया यांच्या कार्याबाबतची माहिती दिली. प्राचार्य व्ही. एच. पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यंदा इंजिनिअरिंग फॉर हेल्थी प्लॅनेट या संकल्पनेवर अभियंता दिन साजरा करण्यात येत असून त्यांनी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यात या वर्षाची थीम आणि चालू घडामोडी आदींवर त्यांनी भाष्य केले. तसेच उत्तम अभियंता होण्यासाठी आवश्यक असणार्‍या गुण वैशिष्ट्यांचेही त्यांनी विवेचन केले.

 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शामकांत पाटील यांनी आपल्या मनोगतातून इंजिनिअर्स डे चे महत्व विषद करून सर विश्‍वसरैया यांच्या जीवनकार्याची माहिती विशद केली. औद्योगीक क्षेत्रात हुशार आणि चतुरस्त्र इंजिनिअर्सची आवश्यकता असून यासाठी आवश्यक असणारे गुण आणि त्यांना विकसीत करण्याचे स्कील याबाबत त्यांनी विस्तृत उहापोह केला. या कार्यक्रमाचला गोदावरी अभियांत्रीकीतील सर्व विभाग प्रमुख तसेच विद्यार्थी उपस्थित होते. आरजू सैयद या विद्यार्थीनीने सूत्रसंचलन केले. यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक प्रा. प्रवीण पाटील यांचे सहकार्य लाभले.

Protected Content