नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात मागील २४ तासात तब्बल ३८ हजार ९०२ नवे करोनाबाधित आढळले असून, ५४३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १० लाख ७७ हजार ६१८ वर पोहचली आहे.
देशात आतापर्यंतची एका दिवसातील करोना रुग्ण संख्येतील सर्वाधिक वाढ नोंदवल्या गेली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात ३ लाख ७३ हजार ३७९ सक्रिय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत २६ हजार ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर, ६ लाख ७७ हजार ४२२ रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या १०.८६ टक्के आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ही ब्रिटन देशातील एकूण रुग्णांपेक्षा जास्त आहे.जर महाराष्ट्र हा देश असता, जर जगातील एकूण कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत 10वा क्रमांक असता. राज्यात शनिवारी ८ हजार ३४८ नवे कोरोना रुग्ण सापडले. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १४४ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांचा आकडा हा ११ हजार ५६९ वर पोहचला आहे. तर, राज्यात ३ लाख ९३७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, १ लाख ६५ हजार ६६३ रुग्ण निरोगी झाले आहे.