देशभर कोरोनाचा चिंताजनक विळखा

 

नवी दिल्ली , वृत्तसंस्था । देशात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनत आहे गुरुवारी देशात रेकॉर्डब्रेक ९६ हजार ५५१ रुग्णांची भर पडलीय तर एकाच दिवशी तब्बल १ हजार २०९ जणांनी प्राण गमावलेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहचलीय.

एकूण रुग्णांच्या संख्येपैंकी ९ लाख ४३ हजार ४८० जणांवर उपचार सुरू आहेत. भारतात आत्तापर्यंत ३५ लाख ४२ हजार ६६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे भारतात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ७६ हजार २७१ वर पोहचलीय

महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांमुळे देशाच्या चिंतेत भर पडलीय. महाराष्ट्रात दररोज रुग्णांच्या संख्येत रेकॉर्डब्रेक भर पडताना दिसतेय. महाराष्ट्रात सध्या २ लाख ५३ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २७ हजार ७८७ जणांचा मृत्यू झालाय. तब्बल ६ लाख ८६ हजार ४६२ रुग्णांनी कोरोनावर मात केलीय.

Protected Content