देवळी येथे कृषी मंत्री यांच्या हस्ते शेती औजार बँकेचे उद्घाटन! (व्हिडिओ)

चाळीसगाव, प्रतिनिधी  । आत्मा अंतर्गत क्रांतिवीर रेशीम शेतकरी गटाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजतून शेती औजार बॅंक उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील देवळी येथे राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

आत्मा अंतर्गत क्रांतिवीर रेशीम शेतकरी गटाचे अध्यक्ष विवेक रणदिवे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजतून शेती औजार बॅंक उपलब्ध करून दिली आहे.  चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शेती औजार बँकेचे उद्घाटन शनिवार करण्यात आले.  देवळी येथील आत्मा अंतर्गत क्रांतिवीर रेशीम शेतकरी गटाचे अध्यक्ष विवेक रणदिवे यांनी कृषी मंत्री भुसे यांनी औजार बॅंक मधील औजारे शेतकरी बांधवांना अल्प दरात वापरण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.  यावेळी अनिल महाजन कृषि सहाय्यक यांनी बीजप्रक्रिया विषयावर माहिती दिली. पिंप्री खु. येथील आत्मा अंतर्गत अन्नदाता शेतकरी गटाचे अध्यक्ष नाना पाटील यांनी उपस्थितांसमोर  कृषी विभागाकडून शेतकरी गटास मिळालेल्या योजनांचा लाभ व  सेंद्रिय शेती गट प्रामाणिकरण या विषयावर माहीती दिली. गोरख पारधी, सुभाष पाटील व तुकाराम पाटील यांनी यावेळी शेतकरी बांधवाना सेंद्रिय शेती व शेती पुरक व्यवसाय त्याचबरोबर रेशीम शेती स्मार्ट योजना “विकेल ते पिकेल’ या विषयावर शेतकरी गटा मार्फत राबविण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती अजय पाटील ,   पंचायत समिती उपसभापती भाऊसाहेब पाटील ,  बीडीओ नंदकुमार वायेकर, उपविभागीय कृषी  अधिकारी पाचोरा एन. व्ही. नयनवाड, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, पंचायत समिती  कृषी अधिकारी एम. एस.भालेराव, मंडळ कृषी अधिकारी पल्लवी हिरवे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवथापक ज्ञानेश्वर पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व धनंजय पाटील कृषि पर्यवेक्षक यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले. शेतकरी तसेच कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/652119782413998

Protected Content