Home राष्ट्रीय दूरदर्शनच्या निवेदिका कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन

दूरदर्शनच्या निवेदिका कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन

0
137


 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  ।  जगामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे.  पत्रकार रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी ताजी असतांना आज दूरदर्शनच्या प्रसिद्ध कनुप्रिया यांचेही  कोरोनामुळे  निधन झाले आहे.

 

कानुप्रिया दूरदर्शनच्या निवेदिका  व   अभिनेत्रीही होत्या. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचं सांगितलं होतं. सोबतच मला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांची ऑक्सिजन लेवल बरीच कमी झाली होती.  तापही वाढत होता.

 

शुक्रवारी आजतकचे अँकर रोहित सरदाना यांचंदेखील कोरोनाने निधन झालं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. आज कनुप्रिया यांनादेखील कोरोनाने हिरावलं आहे. पत्रकारिता क्षेत्राला दोन दिवसांत दोन धक्के बसले आहे.


Protected Content

Play sound