जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरातील नागोरी चहाच्या दुकानाजवळ एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दाम्पत्य जखमी झाल्याची घटना बुधवार, २४ मे रोजी दुपारी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील अयोध्यानगरातील रोनक कॉलनी परिसरात योगेश जगदीश यादव हे राहतात. योगेश यादव व त्यांची पत्नी गीता यादव हे दोन्ही बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या एम.एच. १९ .डी.यू. २७६२ या क्रमाकांच्या दुचाकीने जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरातील जात होते. यादरम्यान नागोरी चहाच्या हॉटेलसमोर रस्त्यावर यादव यांच्या दुचाकीला एम.एच.१९ डी.एम.४८२७ या क्रमाकांच्या दुचाकीने धडक दिली. या धडकेत योगेश यादव व त्यांची गीता यादव या दोघांच्या पायाला दुखापत झाली आहे. या अपघातानंतर धडक देणाऱ्या दुचाकीवरील तिघांना हटकले, असता दुचाकीवरील तिघांनी योगेश यादव यांना चापटाबुक्क्यांनी माहराण केली. या प्रकरणी योगेश यादव यांनी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वंदना राठोड ह्या करीत आहेत.