दीर्घ काळापर्यंत एक राष्ट्रीय पक्ष विनाअध्यक्ष कसे काय काम करू शकतो

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । दीर्घ काळापर्यंत एक राष्ट्रीय पक्ष विनाअध्यक्ष कसे काय काम करू शकतो, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

आपल्याला काँग्रेसचे अध्यक्ष बनायचे नाही, असे राहुल गांधी यांनी दीड वर्षापूर्वीच स्पष्ट केले आहे.काँग्रेसचा अध्यक्ष गांधी कुटुंबीयांपैकी नसावा असेही ते म्हणाले होते, या गोष्टीला आता दीड वर्षांचा काळ लोटला, आम्ही ऑगस्ट महिन्यात पत्र लिहिले होते. मात्र कोणीही आमच्याशी चर्चा केली नाही. दीड वर्षानंतरही आम्हाला अध्यक्ष नाही याबाबत मला जाणून घ्यायचे आहे, असे मांडत कार्यकर्ते आपल्या समस्या घेऊन कोणाकडे जाणार असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्राच्या मुद्द्यावर देखील आपली बाजू मांडली. सिब्बल म्हणाले की, ऑगस्ट २०२० मध्ये आम्ही लिहिलेले पत्र हे आमचे तिसरे पत्र होते. गुलाम नबी आझाद यांनी दोन पत्र धाडलेली होती. मात्र, तरी देखील कोणीही आमच्याशी चर्चा केली नाही. म्हणूनच जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी बोललो, असे सिब्बल म्हणाले.

आम्ही २०१४ ची निवडणूक हारलो, काही झाले नाही. त्यानंतर आम्ही २०१९ मध्ये पराभूत झालो. त्यानंतर कोणता मोठा बदल झाला नाही. निवडणुका होत राहतात, मात्र काँग्रेसने कमीतकमी आपल्या भविष्याच्या मार्गावर तरी व्यवस्थित चालले पाहिजे, असे मला वाटत असल्याचे सिब्बल म्हणाले.

नेतृत्वात बदलाबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर सिब्बल म्हणाले की, आमचे प्रमुख नेता जेव्हा अध्यक्ष बनायचे नाही, असे बोलतो तेव्हा मग मी नेतृत्वबदलाबाबत का बोलू?. आपल्याला अध्यक्ष बनायचे नाही, असे राहुल गांधी स्वत: म्हणाले आहेत, असे सिब्बल यांनी सांगितले.

Protected Content