भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थानिक प्रकल्प बाधित ठेकेदाराना कामे मिळावे, निविदा मधील अटी आणि नियम शिथिल करण्यासाठी वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या वतीने सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी दीपनगर येथे चटणी भाकर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार यांनी केले.
या आंदोलनात दीपनगर केंद्राचे माजी मुख्य अभियंता तथा संघटनेचे सल्लागार आर.आर.बावस्कर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे, संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदार,सचिव प्रकाश तायडे, शब्बीर शेख यांनी मार्गदर्शन केले.
दीपनगर प्रशासनाने दुपारी १ वाजता उपमुख्य अभियंता लोटके यांच्या दालनात संघटने सोबत चर्चा केली. याप्रसंगी संघटनेच्या मागण्या रास्त असुन स्थानिक कंत्राटदारांना कामे दिले जातील, असे आश्वासन आणि लेखी निवेदन संघटनेला देण्यात आले. त्याच प्रमाणे उर्वरित मागण्या मुख्यालय येथे पाठविण्यात येईल. स्थानिक कंत्राटदार यांच्या वर अन्याय होणार नाही असे प्रशासनाने सांगितले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, महासचिव दिनेश इखारे, कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, स्थानिक कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष फिरोज पठाण, महाराष्ट्र कंत्राटदार संघटनेचे प्रभाकर सोनवणे, शिवसेना तालुका अध्यक्ष संतोष सोनवणे, निलेश महाजन यांनी जाहीर पाठिंबा दिला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष मन्साराम कोळी, प्रकाश तायडे, संतोष तेलंग, उस्मान पठाण, नारायण झटके, रवी सरदार, जगदीश तराळ,निशांत निकम, नितीन पटाव, विजय भालेराव, तोहसीफ पठाण यांनी परीश्रम घेतले. तालुका पोलिस ठाण्याचे हवलदार प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सुरक्षाअधिकारी रवी व्यास यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.