विजेचा धक्क्याने भुसावळात वृद्धाचा मृत्यू (व्हिडीओ)

vijecha dhakka

भुसावळ प्रतिनिधी ।  येथील गंगाराम प्लॉट परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमृत बाबूलाल वर्मा (वय 60) असे मयत वृद्धाचे नाव आहे.

आज सकाळी प्रात: विधीसाठी अमृत वर्मा हे घराबाहेर पडले. घरा समोरील असलेल्या विद्युत खांबात विद्युत प्रवाह उतरलेला होता. त्यामुळे स्पर्श होताच जोरदार धक्क्यामुळे श्री. शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महावितरणाचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान, महावितरणच्या भोंगळ कारभारावर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Protected Content