जळगाव, प्रतिनिधी । समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके वाटप केली जातात. मात्र, यावर्षी पुस्तकांचे वाटप करण्यात न आल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दिव्या भोसले यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके वाटप केली जातात. मात्र या वर्षी कोरोना संसर्ग उतरत्या कडेवर असताना प्रत्यक्ष शाळेला सुरु झाली नव्हती, पण ऑनलाईन अभ्यास सुरू होता. विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नसल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या दिव्या भोसले यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग तसेच डॉ. राजेंद्र सपकाळे उपशिक्षण जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला. त्याच पार्श्वभूमीवर लवकरच जळगाव जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या ४ लाख २२ हजार ४०३ लाभार्थी विद्यार्थ्यांना लवकरच मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे. नाशिक विभागाकडून पाठ्यपुस्तकांच्या वितरण सुरुवात झाली असून लवकरच केंद्र स्तरावर वितरणाला सुरुवात होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा संपली आहे.