जळगाव प्रतिनिधी । राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीची स्थापना करण्याच्यादृष्टीने या मंडळ/समित्यांचे पुर्नगठन करण्याकरिता दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगाच्या स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्तीकरिता प्रस्ताव मागविण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाकरिता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील 66 च्या उपकलम 2 मधील (ई) अन्वये नियुक्तीकरिता सदस्यांची नावे, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच त्यांची संक्षिप्त माहिती व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यात यावी. सदरची माहिती थोडक्यात मराठी/इंग्रजीमध्ये पेनड्रार्व्हव्हमध्ये अथवा [email protected] या मेलवर पाठवावी व हार्ड कॉपी तीन प्रतीत कार्यालयात पुरविण्यात याव्यात. दिव्यांगत्व व त्यांचे पुनर्वसन या क्षेत्रातील तज्ज्ञ असतील अशा 5 व्यक्ती, राज्य शासनाने विहित केलेल्या आळीपाळीने (रोटेशन पध्दतीने) जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करणेसाठी नामनिर्देशित करावयाचे असे 5 प्रतिनिधी/व्यक्ती, (जिल्हा प्रशासनाकडुन शिफारस केली नसल्यास नामनिर्देशन करता येणार नाही.), दिव्यांगत्वाशी संबधित असणा-या अशासकीय संस्था किंवा दिव्यांगत्व असणा-या व्यक्तींच्या संस्थांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी शक्य असेल इतके 10 दिव्यांग व्यक्ती (या उपखंडाखाली सदस्य म्हणुन नामनिर्देश करण्यात येणा-या 10 व्यक्ती पैकी कमीतकमी 5 व्यक्ती महिला आणि कमीतकमी एक व्यक्ती अनु.जाती व अनु. जमाती पैकी असावी अशी तरतूद आहे. 3 पेक्षा जास्त नसतील असे राज्यस्तरावरील वाणिज्य व उद्योग संघाचे 3 प्रतिनिधी यांनी अर्ज करावेत.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील उपकलम 2 (2)अन्वये दिव्यांगत्वावर संशोधन करण्याकरिता गठीत करावयाच्या संशोधन समितीवर नियुक्तीकरिता सदस्यांची नावे, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच त्यांची संक्षिप्त माहिती व उल्लेखनिय कामगिरीची माहिती देण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने नामनिर्देशनाने वैज्ञानिक/संशोधक यामधुन नियुक्त केलेले 3 सदस्य (परंतु सदरचे वैज्ञानिक/संशोधक यांचे संशोधनास केंद्र किंवा राज्य शासनाच्या कायद्यान्वये स्थापित नामांकीत (अधिकृत) संस्थेने मान्यता दिलेली असणे आवश्यक आहे), अधिनियमातंर्गत निर्दिष्ठ केलेल्या दिव्यांग प्रकारातील तज्ज्ञ व्यक्ती 4 सदस्य (परंतु अधिनियमातंर्गत निर्दिष्ठ केलेल्या कोणत्याही दिव्यांगत्वाच्या प्रकारातील वैज्ञानिक व अथवा तज्ञ व्यक्ती असेल व अधिनियमातंर्गत निदीष्ट केलेल्या दिव्यांगत्वाच्या प्रकारातील दिव्यांगत्व धारणकरीत असेल अशा व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल. वरिलप्रमाणे प्रस्ताव दिनांक 28 ऑक्टोबर, 2020 पर्यत संक्षिप्त माहितीसह 3 प्रतीमध्ये कार्यालयीन वेळेत जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, जळगाव या कार्यालयात स्वीकारण्यात येतील. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.