नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली आहे.
दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्ली हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी व्हावी. याशिवाय, हिंसाचारातील प्रत्येक पीडित कुटुंबाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. तसेच, हिंसाचारादरम्यान ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काहीच केले नाही, त्यांच्यावर आणि भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे मुकुल वासनिक यांनी म्हटले आहे. तसेच गृहमंत्री (अमित शहा) यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी वासनिक यांनी केली आहे.