दिल्लीत उभारणार छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक : फडणवीस

रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाची राजधानी असणार्‍या दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडावरील कार्यक्रमात केली.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास आज तिथीनुसार ३५० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमीत्ताने राज्य सरकारकडून रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याकरिता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार   आहे.

 

 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही मावळे आहोत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पंतप्रधान मोदींकडे जाऊ आणि महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे झालं पाहिजे ही भावना निश्चित पूर्ण करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यासोबत राज्यातील प्रत्येक प्रमुख सहा शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित उद्याने ५०-५० कोटी रुपये खर्च करून तयार करणार आहोत. त्याच सोबत भरत गोगावले यांची शिवसृष्टीची मागणी आहे. त्याला देखील मी समर्थन देतो आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी शिफारस करतो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Protected Content