राज्यातील दहावीचा निकाल ९३.८३ टक्के ! : यंदाही मुलींची बाजी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अलीकडेच झालेल्या दहावी परिक्षेचा निकाल लागला असून यात एकूण ९३.८३ टक्के उत्तीर्ण झाले असून यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल लागल्यानंतर उत्सुकता लागली होती ती दहावीच्या निकालाची ! या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाबतची आकडेवारी जाहीर केली.

 

यंदा दहाविचा राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत ९५.८७ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर ९२.०५ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात ९८.११ टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजेनंतर ऑनलाईन या प्रकारात निकाल पाहता येणार आहे.

Protected Content