मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीतील हिंसाचार हा सुनियोजित कट होता. गृहमंत्र्यांना दिल्लीची परिस्थिती हाताळता आली नाही की, त्यांनी तसे निर्देश पोलिसांना दिले होते का ? याची चौकशी करण्यात यावी. तसेच अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे.
दिल्लीत निवडणूक होण्याआधी दोन महिने केंद्रातील नेते वातावरण बिघडवण्याचे काम करत होते. अगदी गृहमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले होते अशी चर्चा आहे. भाजपाचे मंत्री अनुराग ठाकुर, कपिल मिश्रा यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे आणि अनुराग ठाकुर यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. कपिल मिश्रा यांनी ट्रम्प गेल्यावर बघून घेऊ असे धमकावले होते. दिल्लीत पोलिसांनी आपली कर्तव्य बजावले नाही. राजकीय दबावाला पोलीस बळी पडले आहेत. पोलीस खात्याने जबाबदारी पार पाडली नाही. ही सुनियोजित घटना होती, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.