नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाच्या पुढील लाटेबाबत तज्ज्ञ इशारा देत असतांना आता फायझर या ख्यातनाम कंपनीने आपल्या कोरोनावरील लसीला ९० टक्के यश लाभल्याची माहिती आज जाहीर केली आहे.
फाझयर या विश्वविख्यात औषध कंपनीने दावा केला आहे की कोविड १९ लस ९० टक्के प्रभावी आहे. एक स्वतंत्र डेटा देखरेख समितीने केलेल्या विश्लेषणानुसार, फायझर आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी फर्म बायोटेक यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
जगभरात अनेक कंपन्यांनी कोरोनाच्या लसीच्या उत्पादनाचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात अनेक कंपन्यांच्या क्लिनीकल ट्रायल्सला यश लाभल्याचे दिसून येत आहे. तथापि, आजवर कोणत्या कंपनीला ९० टक्के यश मिळाले नसल्याची माहिती समोर आली नसतांना फायझरने केलेली घोषणा महत्वाची मानली जात आहे.