जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव येथील ५० जणांचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. यापुर्वी काल रात्री २४ जणांचे अहवाल देखील निगेटीव्ह आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज रूग्णांची संख्या वाढत असल्याने एकीकडे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. आत्तापर्यंत २३२ जण कोरानाबाधित झाले आहे. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ५० जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज सकाळी सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. काल गुरूवारी रात्री उशीरा २४ जणांचे अहवाल देखील निगेटिव्ह आला होता. दोन्ही दिवसांच्या अहवालामुळे जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.