नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ४० टक्के घट झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढून १३ हजार ३८७ झाली आहे. तर ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात कोरोनामुळे २३ लोक मरण पावले आहेत. पण देशात कोरोना प्रकरणात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोना संक्रमित रुग्णांपैकी १३.६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. आपण कोरोनाशी कसोशीने लढा देत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आढळलेले रुग्ण आणि १ एप्रिलपासून आजपर्यंत आढळलेले रुग्ण यांची तुलना केली असता एप्रिल महिन्यात हे प्रमाण कमी झाल्याचे दिसतं आहे. तसेच आमचं सर्व लक्ष लवकरात लवकर कोरोनावर लस विकसित करण्यावर आहे, असेही लव अग्रवाल यांनी सांगितले.