जळगाव प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथील कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या २५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्व संशयित व्यक्तीचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली.
चोपडा तालुक्यातील अडावद येथील कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या २५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्वांचे अहवाल आज जिल्हा कोवीड रूग्णालयात प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे. ही बाब जरी दिलासादायक असली तरी नगरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करावे, आपल्यासह आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा कोवीड रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.