जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात केवळ ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दहा तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-०, जळगाव ग्रामीण -०, भुसावळ -०, अमळनेर -०, चोपडा-१, पाचोरा-१, भडगाव -०, धरणगाव -०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर -०, रावेर -०, पारोळा-१, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज यावल तालुक्यानंतर एरंडोल तालुका देखील कोरोनामुक्त झाल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.