दिपनगरला छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने सप्तहाभर विविध कार्यक्रम

shivjayanti

भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्‍यातील दिपनगर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताहाभार विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.

उत्सव समितीचे अध्यक्ष भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, कार्याध्यक्ष तथा मुख्य अभियंता प्रकल्प ६६० मेगावॅट विवेक रोकडे, उपाध्यक्ष उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर, सुनील रामटेके, सुनील इंगळे, ज्ञानोबा मुंडे, मधुकर पेटकर, संयोजक पंकज सनेर, कल्याण अधिकारी सचिव अरुण शिंदे, सहसचिव सागर थोरात, अनिल वानखेडे, कोषाध्यक्ष विकास पाटील, सहकोषाध्यक्ष अनिकेत सोळसकर, महेश डोंगरे, अंतर्गत हिशोब तपासणीस राजेंद्र निकम यांची निवड करण्यात आली होती. उत्सव समितीतर्फे दिनांक १६ फेब्रुवारी रोजी नवीन क्रीडा भवन येथे दिपनगर वसाहतीतील मुला मुलींसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात एकूण ३२५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तसेच वसाहत परिसरामध्ये किल्ले बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. यात एकूण २८ किल्ले बनवण्यात आले होते. दि.१७ रोजी अर्पण ब्लड बँक धुळे तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील ८० पुरुष ३ महिलांनी रक्तदान केले. दि.१८ रोजी अस्थिरोग निदान शिबिर,दंत चिकित्सा शिबीर व मूत्र विकार व शल्यचिकित्सा शिबिर घेण्यात आले होते. यामध्ये डॉ. प्रकाश कोठारी, डॉ. हर्षा कोठारी, डॉ. पराग भिरूड, डॉ. प्रशांत जाधव यांनी तपासणी केली. दि.१९ रोजी  समिती अध्यक्ष तथा मुख्य अभियंता पंकज सपाटे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. शिवव्याख्याते अक्षय राऊत यांचे शिवचरित्रावर व्याख्यान घेण्यात आले. यावेळी ४६० शिवप्रेमी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लीलाई अनाथ बालकाश्रम जळगाव यांना इन्व्हर्टर भेट देण्यात आला. यावेळी बालकाश्रमाचे संचालक विठ्ठल पाटील उपस्थित होते. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक ढोल ताशे पथक व जय बजरंग व्यायाम शाळा पारस यांच्या फिरत्‍या कवायती सह काढण्यात आली. दि.२० रोजी शिवशाहीर मानस शिंदे नाशिक यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम व वसाहतींमधील रहिवाशांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. दि.२१ रोजी वसाहतीमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी बुगी-वुगी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात ५२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.दि.२२ रोजी विजेंद्र केंजळे सातारा निर्मित साज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गाण्यांची सुरेल मैफल घेण्यात आली. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होऊन संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला .कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर.पी. निकम, उमाकांत चव्हाण, विकास पाटील, संजय देसाई, अनिल वानखडे, अरुण शिंदे, सिद्धेश्वर काळे, अनंत सोनवणे, वाल्मीक कवडे, संदीप सदाबल, नितीन सोनवणे, संदीप शिंदे, राजेश शिंदे, विजय पवार, गजानन वायाळ, महेश डोंगरे, अनिकेत सोळसकर, सचिन नाकाडे, सागर थोरात तसेच भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी,कर्मचारी, कंत्राटदार,कंत्राटी कामगार यांचे सहकार्य लाभले.

Protected Content