दाखल गुन्हा प्रकरणी मंत्री राणेंना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – धुळे पोलिसांतर्फे दाखल गुन्हा प्रकरणी कारवाई संदर्भात हमी देऊ शकत नाही, असा खुलासा राज्य सरकारने केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालायाने केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना दिलासा दिला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये रायगड येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्त्यव्य केले होते. याविरोधात राज्यात विविध जिल्ह्यात मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

धुळे पोलिसांनी देखील २४ ऑगस्ट रोजी राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल  मंत्री नारायण राणे यांना आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची नोटीस बजावली होती. यासंदर्भात मंत्री राणे यांचे वकील अ‍ॅड्. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत राणे यांनी हायकोर्टात धाव घेऊन धुळे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत कठोर कारवाईसह आरोपपत्र दाखल करण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

दरम्यान आपल्याविरोधातील आरोप हे राजकीयदृष्टय़ा प्रेरित असल्याचा दावाही राणे यांनी याचिकेत केला होता. त्याचवेळी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल किंवा कोणत्याही विशिष्ट वर्गाच्या किंवा गटाच्या विरोधात द्वेषपूर्ण हिंसाचार किंवा संताप वाढवण्याचा कोणताही हेतू नव्हता. मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचाही आपला हेतू नव्हता, असा दावाही राणे यांनी केला होता.
यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून नारायण राणे यांना दोन आठवडे अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यात आला असून तसे आदेश दिले आहेत.

Protected Content