दहीगाव येथे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव येथे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ सरपंच साजिया तडवी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी हेमंत बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात करण्यात आली.

यावल तालुक्यातील गावागावात जावून ही मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पहिली फेरी १२ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर २०२० ह्या कालावधीत राबविण्यात येत आहे. दहिगाव येथे सरपंच साजिया तडवी यांच्या उपस्थितीत ह्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत आशा सेविका, अंगणवाडी सेविका, व ग्रामपंचायत कर्मचारी असे आरोग्य पथक ( टीम) तयार करण्यात आले. हे पथक घरांना भेटी देऊन घरातील व्यक्तींचे व ५० वर्षावरील व्यक्तींचे तापमान ऑक्सिजन लेवल तपासण्यात आले. भेटीदरम्यान तापमान जास्त, ऑक्सीजन लेव्हल कमी, खोकला, आणि इतर लक्षणे असणाऱ्या, व कोमॉरबिड रुग्ण आढळलेल्या व्यक्तींना संदर्भित करण्यात आले.

मोहीम यशस्वितेसाठी आरोग्य विभागातील राजेंद्र बारी, अनिता नेहते, आशा सेविका नीता महाजन, अर्चना मेढे, संध्या बाविस्कर, पुष्पा पाटील, भाग्यश्री महाजन, अंगणवाडी सेविका मंगला महाजन, मंदाकिनी पाटील, शकुंतला पाटील, छाया अडकमोल, मंगला तेली, विजया महाजन व ग्रामपंचायत कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत.

Protected Content