केंद्रीय समिती संघप्रमुखांनी केली वृक्ष लागवडीची पाहणी

 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केंद्रीय समितीचे पथक प्रमुख रिजवान यांनी अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना बिहार पॅटर्न अंतर्गत लावलेल्या वृक्षलागवडची पाहणी केली. तसेच शौष खड्ड्यांची पाहणी केली.

गावातील ग्रामपंचायत जेष्ठ सदस्य वर्षा पाटील, शिवाजी पारधी सदस्य, योगिता गोसावी सदस्य, वैशाली माळी सदस्य यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.

रोजगार हमी योजने अंतर्गत मागील वर्षी लावलेल्या वृक्षलागवड, अटल घनवन (मियावकी)तसेच ह्या वर्षी लावलेल्या मियावकी वृक्षलागवडची पाहणी करण्यात आली. कामांचा बाबतीत समाधान व्यक्त करण्यात आले व ग्रामपंचायत दहिवद चं कोतुक करण्यात आले.

समिती सोबत प्रसाद मते उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.), विशाल शिंदे गटविकास अधिकारी प.स. अमळनेर, प्रशांत पाटील(जिल्हा MIS कॉरडीटर), किशोर ठाकरे (APO), किशोर पाटील (TPO), धिरज पाटील (TPO), राजेंद्र सोनवणे (ग्राम विकास अधिकारी दहिवद), भागवत सोनवणे (रोजगार सेवक) रोजगार हमी योजना अंतर्गत काम करणारे मजूर महिला वर्ग व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content