बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी कोळी महासंघाच्या विभागीय मेळाव्यात माजी मंत्री दशरथ भांडे यांचा महर्षी वाल्मीकी यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
जळगाव येथे आदिवासी कोळी महासंघाचा विभागीय मेळावा व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी आदिवासी कोळी महासंघाचे संथापक तथा माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, प्रभाकर आप्पा सोनवणे गटनेते तथा राज्य उपाध्यक्ष आ.कोळी महासंघ आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
आदिवासी कोळी समाजाचा सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक,व राजकीय विकास साधण्याच्या हेतूने ,युवकांना सामाजिक व्यासपीठावरून समाज प्रबोधनाची संधी मिळावी यास्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .यावेळी भुसावळ तालुकाध्यक्ष गणेश कोळी यांनी दशरथ भांडे यांना आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची सुदर अशी मूर्ती भेट दिली.
यावेळी त्यांचेसोबत संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी तथा सागर ठाकरे ;तालुका युवा अध्यक्ष ,महेश कोळी :सोशल मिडिया प्रभारी ,व सहकारी यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी एकजूट होऊन सामाजिक विकास साधण्यासाठी समर्पित असल्याचे सांगितले.