पहूर, ता. जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील वाकोद येथे गेल्या महिन्यात झालेल्या दरोडा प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली. मात्र आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी कोरोना चाचणी केली असता एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तालुक्यातील वाकोद येथे गेल्या महिन्यात दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी केली असता एकाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तत्पूर्वी पाच आरोपी व यांच्यासोबतच पहूर येथील दि. 13 रोजी घडलेल्या दंगलीच्या घटनेतील आज आणखी सात युवक व सोबत तीन कर्मचारी यांनी एकाच गाडीत त्याचा प्रवास केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ही बाब चिंतेची असून या सर्वांची कोरोना चाचणी केली असता यातील ११ आरोपी निगेटीव्ह तर एक आरोपी कोरोणा पाॅझिटीव आला आहे. पाॅझिटीव आलेला आरोपीस जळगाव येथील कोवीड सेंटरला दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. तर ११ जण निगेटीव्ह व एक कोरोना पाॅझिटीव आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी दिली आहे.