चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील दरेगाव शिवारातील गावठाण भागातून ४० हजार किंमतीची दोन गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत मेहूनबारे पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, अरूण गुलाबराव पाटील (वय-५२ रा. दरेगाव ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. शेती हा व्यवसाय असल्याने दरेगाव शिवारातील गावठाण भागात वरखेडे रोड लगत जमिनीवर शेड उभारण्यात आला आहे. त्यात मुळ मालकीचे जनावरे बांधलेले असतात. मात्र अरूण गुलाबराव पाटील हे शनिवार, २९ रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास गुरांना चारापाणी करून झोपण्यासाठी घरी गेले. ३० रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास दुध काढण्यासाठी शेतात आले असता दोन गायी एक २० हजारची पांढ-या रंगाची गाय व दुसरी २० हजार किंमतीची काळ्या रंगाची जर्सी गाय असे एकूण ४० हजार किंमतीची दोन गायी चोरीला गेल्याचे कळताच अरूण गुलाबराव पाटील यांनी लागलीच मेहूणबारे पोलिस स्थानक गाठून भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस नाईक अनवर तळवी हे करीत आहेत.