दगडफेक : अतिक्रमण विभागाच्या वाहनावर फळविक्रेत्यांकडून दगडफेक; दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । महानगरपालिकच्या अतिक्रमण विभागाच्या वाहनावर फळविक्रेत्यांकडून दगडफेक केल्याची घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास सागर पार्कसमोर घडली. याप्रकरणी फळविक्रेत्या दोघा भावांना अटक केली असून रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, कोरोना विषाणूमुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शहरातील सागरपार्क समोर बसलेले अशफाक मुस्ताक बागवान आणि अल्ताफ मुस्ताग बागवान फळविक्रेते दोन्ही भावंडांना फळ गल्लीत लोढगाडीच्या मदतीने विक्री करण्याचे सांगण्यात आले होते. असे असंताना अतिक्रमण विभागाने दिलेल्या सुचनाचे पालन न केल्याचे अतिक्रमण विभागाच्या लक्षात आले. त्यांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोन्ही फळविक्रेत्यांची गाड्या जप्त करून जप्तीसाठी आलेल्या ट्रक्टरवर टाकली. हे पाहून दोन्ही बागवान भावंडांनी अतिक्रमण विभागचे ट्रक्टरवर दगडफेक केली. या ट्रक्टरचे हेडलाईट फुटला. दोघे घटनास्थळाहून पसार झाले.

झालेल्या घटनेबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत दोघे पसार झाले होत. दोघांना दंगलग्रस्त भागातून अटक करत रामानंद नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दोघांवर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अल्ताफ पठाण, अनमोल पटेल, वाहन चालक वासुदेव मोरे यांनी कारवाई केली.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content