शेगांव शहरात कोरोना रुग्ण आढळल्याने पोलिस विभागातर्फे पथसंचलन

शेगांव, प्रतिनिधी । कोरोना पार्श्‍वभूमीवर संपूर्ण भारत लॉकडाउन परिस्थितीमध्ये असताना बुलढाणा जिल्ह्यात ऐकुन १५ रुग्ण झाले असुन शेगाव शहरात रुग्णाची संख्या तीन वर गेलेली आहे. ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत तो भाग पूर्ण तीन किलोमीटर पर्यंत सिल करण्यात आला आहे.

नागरिक हे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडतच आहेत. शेगांव शहरासह जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याकारणाने जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचा वेळ हा सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत केलेला आहे. यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडून करण्यात येत आहे. शेगाव शहर हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू नये याकरिता व नागरिकांनी गांभीर्य बाळगून मनात भीती न ठेवता घरामध्येच राहून कोरोना संसर्गाचा सामना करावा. जे रुग्ण आढळलेले आहेत जर त्यांच्याशी कोणाचा संपर्क झाला असेलतर स्वतहाहुन पोलिस प्रशासनाला कळवुन आपली चाचणी करुन घ्यावी असे आवाहन बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आहे. संपूर्ण शहरातुन पथसंचलन काढल्यानंतर लोकांनी फुलांचा वर्षाव केला. शिवाय, चालते फिरते सॅनिटायझेशन वाहन या पथका सोबत असते. त्यामुळे सर्व पोलीस कर्मचारी यांनी या वाहनांमध्ये जाऊन स्वतःला सॅनिटायझर करून घेतले व स्वतःची सुरक्षा करत काळजी करताना या ठिकाणी संपूर्ण पोलीस रक्षकांची टिम दिसून आली.

Protected Content