रावेर, प्रतिनिधी | थेरोळा शेती शिवारामध्ये पट्टेदार वाघाच्या संचार सुरु असून नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.याची माहिती नागरीकांनी विभागाला दिली आहे. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबटने गाय फस्त केली होती.
दोन दिवसांपूर्वी थेरोळा परिसरात बिबट्याने एका गायीला फस्त केल्याची घटना घडल्या नंतर आज पुन्हा काही शेतामध्ये मोठे पगमार्ग मिळाले आहे. पगमार्ग बघून संचार करणारा प्राणी पट्टेदार वाघ असल्याची शक्यता असून त्यांच्या मागे दोन पिल्लची सुध्दा पगर्माग नागरीकांना दिसले आहे.याची माहिती नागरीकांनी वनविभागाला दिली आहे.वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे.पगर्माग बघण्याचे काम होणार आहे.