थोरगव्हाण येथे दोन गटात हाणामारी; चार जखमी, पाच जणांना अटक

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण शिवारात रस्त्यात दुचाकी लावण्याच्या कारणावरून दोन गटात सिनेस्टाईल झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून यावल पोलीसात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या फिर्यादीत रामेश्वर किशोर पाटील (वय-१९) याने म्हटले आहे की, थोरगव्हाण शिवारात शनिवारी १० जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शेतातून घरी येत असतांना त्याने रस्त्यावर लावलेली (एमएच १९ डीडी ७१८२) क्रमांकाची दुचाकी जवळ  समाधान मंगल सोनवणे, निलेश समाधान सोनवणे, योगेश लहु सोनवणे व सुनिल रामकृष्ण सोनवणे सर्व रा.थोरगव्हाण ता. यावल हे उभे दिसले. दुचाकी रस्त्यावर का लावली आमचे वाळूचे ट्रक्टर येत आहे, असे सांगून शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील, रामेश्वर पाटील, गणेश पाटील आल्याने त्यांना देखील मारहाण करण्यात आली. तर दुसऱ्या फिर्यादीत  समाधान मंगल सोनवणे यांनी म्हटले आहे की, शनिवार १० जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास थोरगव्हाण गावशिवारात ज्ञानेश्वर पाटील, रामेश्वर पाटील, गणेश पाटील, प्रविण पाटील सर्व रा. थोरगव्हाण यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटने चार जण किरकोळ जखमी झाले आहे. दोन्ही गटाने परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ गोरख पाटील करीत आहे.

Protected Content