विधी महाविद्यालयतर्फे ऑनलाईन चर्चासत्र

जळगाव, प्रतिनिधी ।  एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी संवाद क्षमता या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. 

 

चर्चासत्रास प्रमूख वक्ते म्हणून वालचंद महाविद्यालय, सोलापूर येथील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर जोशी, केलिफॉर्नोया येथील बार्कले विद्यापीठाचे डॉ. रजूनायके, कोलकत्ता येथील आयईएम- यूईएम ग्रुपचे डॉ. समापिका दास बिस्वास हे लाभले होते. प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी धुळे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बहिराम वी. वाय. हे उपस्थिती होते. कार्यक्रमास समन्वयक डॉ. वैभव सबनीस, आणि प्रा. जी.वी. धुमाळे,  डॉ. रेखा पाहूजा, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, डॉ. शेगावकर, डॉ. अंजली बोंदर, ग्रंथपाल अमिता वराडे, प्रा. भव्या मारथी उपस्थित होते. चर्चासत्रात देश विदेशातील प्राध्यापक, संशोधक, वकील आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.  यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जोशी यांनी संवादाचे विविध प्रकार, संवादातील अडथळे सांगून इंग्रजी संवाद क्षमता प्रभावी करण्यासाठी शब्दसाठा महत्वाचा असल्याचे विविध उदाहरण देऊन स्पष्ट केले. डॉ. राजूनायक यांनी इंग्रजी भाषे संबंधी आपल्या मनातील न्यूनगंड अधोरेखित करून भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत संगीताचे महत्व स्पष्ट केले. डॉ. समापिका यांनी इंग्रजी संवाद क्षमता बाबतीत मानसशास्त्रीय विश्लेषण केले.  तत्पूर्वी डॉ. सबनीस यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडून कार्यक्रमाची सुरूवात केली. डॉ. बहिराम यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. रेड्डी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून अध्यक्षीय मार्गदर्शन केले. प्रा. धुमाळे आणि डॉ. सबनीस यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शेवटी मान्यवरांचे आभार मानले.

 

Protected Content