मुंबई प्रतिनिधी । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून थॅलसेमियाग्रस्तांना मदत करण्याची मागणी केली आहे.
कालच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले आहे. थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून केली आहे.
पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे की, एकीकडे करोनाग्रस्तांना उपचार मिळण्यात येत असलेल्या अडचणी आणि दुसरीकडे करोनाव्यतिरिक्त विविध आजारांनी ग्रासलेल्यांना उपचार-शस्त्रक्रिया इत्यादींसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. विविध आजारांचे प्रश्न पुढ्यात येत आहेत. अशावेळी शासन म्हणून करोनाग्रस्त आणि इतरही रुग्णांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे नितांत गरजेचं आहे. सध्या टाळेबंदी असल्याने या क्षेत्रात कार्यरत असणार्या सामाजिक अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. या संस्था अडचणीत आल्याने थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्तपुरवठा करणे हे अतिशय जिकरीचे काम होऊ बसले आहे. यामुळे या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.