प्रफुल्ल पटेल मोदींच्या कानमंत्राने चालतात ; राज्यपालांचे जाहीर विधान

 

 

गोंदिया: वृत्तसंस्था ।  प्रफुल पटेल हे मोदींच्या कानमंत्रावर चालत असल्याचं सांगत राज्यपालांनी एकच खळबळ उडवून दिली आहे

 

”मनोहर भाई पटेल यांच्याप्रमाणे मी देखील शेकडो शाळा उघडल्या, मात्र आपल्या वडिलांचे शाळांना नाव दिले नाही”, असा टोला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी प्रफुल पटेलांना लगावलाय.  गोंदिया जिल्ह्याचे शिक्षण महर्षी मनोहर भाई पटेल यांच्या जयंती निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपस्थिती लावली, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांवर निशाणा साधला.

 

आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १९ प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गोंदियात सत्कार करण्यात आला. कोश्यारी यांनी भाषणातून प्रफुल पटेलांना चिमटे काढले.

 

 

स्वर्गीय मनोहर भाई पटेल हे स्वतः अशिक्षित असताना त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी एकाच दिवशी २२ शाळा उघडल्या, त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात शेकडो शाळा, महाविद्याल उघडली गेली. गोंदिया जिल्ह्यातील विद्यर्थ्यांना शिक्षणाकरिता इतर ठिकाणी जावे लागत नाही. यामुळे त्यांच्या स्मृतिनिमित्त गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत असतो.

 

 

सत्कार करण्यात आलेल्या लोकांमध्ये  १९ पैकी १६ मुली आहेत. आज शिक्षणात मुलींनी प्रगती केली असून, मुलांनी मुलींकडून शिकण्याची गरज असल्याचे मत कोश्यारी यांनी व्यक्त केले.  प्रफुल पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानमंत्रावर चालत असून, त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात सबका साथ सबका विकास साधल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले.

Protected Content