चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | वीज चोरीप्रकरणी थकीत बिल वसूलीसाठी गेलेल्या विद्यूत सहाय्यकाला चापट बुक्यांनी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी शहरातील हुडको कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील हुडको काॅलणीत राहणारे अश्रफखान गुलाबखान कुसाई यांनी आकोडाद्वारे वीज चोरी केल्याने त्यांच्याकडे थकीत बिल वसूलीसाठी आज दुपारी १२ वाजता महावितरण विभागाचे सहायक अभियंता राजेश वर्मा, विद्यूत सहाय्यक अमोल तायडे, वरीष्ठ तंत्रज्ञ भाऊसाहेब सुर्यवंशी, कंत्राटी कामगार चंद्रकांत पाटील आदी आपल्या शासकीय वाहनाने गेले. तत्पूर्वी पोलिस बंदोबस्ताची मागणी केलेली असल्याने दोन पोलिस कर्मचारी देखील होते. मात्र यावेळी इतरांवर कारवाई न करता आमच्यावरच करीत असल्याचे सांगून शिवीगाळ करायला सुरुवात केली. व त्याठिकाणी येऊन अन्नु शेख व आरबाज शेख उर्फ जग्गा यांनी विद्यूत सहाय्यक अमोल तायडे यांना चापट बुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून सदर वाद मिटवला. या घटनेप्रकरणी अमोल तायडे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अश्रफखान गुलाबखान कुसाई , अन्नु शेख उर्फ बने व आरबाज शेख उर्फ जग्गा सर्व रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.