‘त्या’ रेशन दुकानदारावर फौजदारी कारवाई: लाईव्ह ट्रेंडस न्यूजचा दणका

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुळकर्णी । तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील रेशन दुकानदार ग्राहकांची पिळवणूक करून काळाबाजार करत असल्याचे राजू पटेल यांनी केलेले स्टींग ऑपरेशन ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’वर प्रसिध्द झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. याची तातडीने दखल घेत प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले आणि तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी आज वाघोदा येथे भेट देऊन या प्रकाराची चौकशी केली.

त्यांनी गावातील रेशनधारकांना योग्य प्रकारे धान्य मिळते की नाही ? याची विचारणा केली. तर तक्रारदार राजू पटेल यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी संबंधीत दुकानदारावर फौजदारी कारवाई करत असल्याची माहिती देत या दुकानदाराचे स्वस्त धान्याचे दुकान हे दुसरीकडे संलग्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. पहा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत दिलेल्या माहितीचा व्हिडीओ.

खाली पहा राजू पटेल यांनी केलेले स्टींग ऑपरेशन.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/621835831729661

खाली पहा : प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिलेली कारवाईची माहिती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/244581726670140

Protected Content