‘त्या’ डॉक्टरवर कारवाई करा ; तालुका कॉंग्रेसची मागणी

 

धरणगाव, प्रतिनिधी । काल धरणगाव ग्रामीण रूग्णालयात सरकारी डॉक्टराने एका महिलेची प्रसूती करण्यास नकार दिला. या घटनेचा तालुका काँग्रेसकडून निषेध करण्यात आला असून त्या संबंधीत डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की, काल धरणगाव ग्रामीण रूग्णालयात सरकारी डॉक्टराने एका महिलेची प्रसूती करण्यास नकार दिला. ही धरणगाव तालुक्यासाठी लाजिरवाणी घटना आहे. विशेष म्हणजे त्या डॉक्टराने महिलेला जळगाव हलवण्यासाठी रुग्णवाहीका देण्यास नकार दिला. या डॉक्ट वर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच रुग्णांना सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी धरणगाव तालुका कॉंग्रेस कडून तहसीलदाऱ नितीन कुमार देवरे निवेदन देवून करण्यात आली. यावेळेस धरणगाव तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रतिलाल चौधरी तसेच तालुका कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी व विकास लांबोळे उपस्थित होते.

Protected Content