…’त्यांना’ एसएसजी कमांडोंना घाबरावेच लागेल- शहा

कोलकाता । देशातील शांतता भंग करणार्‍यांना एनएसजी कमांडोंना घाबरावेच लागेल असे सूचक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. ते एनएसजीच्या कार्यक्रमात बोलत होते.

पश्‍चिम बंगालमधील राजारहार येथे आज नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच एनएसजीच्या कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, मआम्हीला सर्व जगात शांतता हवी आहे. आपल्या इतिहासात गेल्या १० हजार वर्षात भारताने कोणावरही हल्ला केलेला नाही. आम्ही कोणालाही आमची शांतता भंग करू देणार नाही. जर कोणी आमच्या जवानांचा जीव घेईल त्यांना त्यांच्या कृत्याची किंमत चुकवावी लागेल. जे देशात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करतील आणि देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील त्यांनी एनएसजीला घाबरायला हवे. तरीही ते जर धाडस करतील तर त्यांच्याशी लढून त्यांना हरवण्याची जबाबदारी एनएसजी आहे.आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरुद्ध झीरो टॉलरेस धोरण अवलंबले आहे. या धोरणात एनएसजी मुख्य भूमिका निभावत आहे. जेव्हा मोदी सरकार अस्तित्वात आले त्यावेळी मला भारताच्या सुरक्षेच्या आणि परराष्ट्र धोरणात अमुलाग्र बदल झाल्याचे जाणवले असे शाह म्हणाले.

Protected Content