शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी | येथील वैशालीताई विलास चौधरी यांची खान्देश तेली समाज मंडळाच्या जळगांव जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
तेली समाजातील विविध उपक्रमात वैशालीताई चौधरी यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची जळगांव जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रविंद्र चौधरी, तसेच धुळे, जळगांव, जामनेर, शेंदुर्णी व पंचक्रोशीतील तेली समाज बांधवांच्या कडुन त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.