एलीबीचं पथक ऍक्शन मोडमध्ये – एकाच दिवशी हस्तगत केले ५ गावठी कट्टे

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यानी कामगिरीचं सत्र सलग तिसऱ्याही दिवशी सुरूच ठेवलं आहे. आजही एलीबीच्या पथकाने एकाच दिवशी केले ५ गावठी कट्टे हस्तगत करत चौघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच १ मॅगझीन आणि ७ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरात धाडसत्राच्या माध्यमातून सट्टा, जुगार यासारख्या अवैध धंद्यांवर कारवाई केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून बुधवारी गुटखा संदर्भात कारवाया करण्यात आल्या होत्या. हे कारवायांचे सत्र आजही सुरूच ठेवत एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळ आणि विदगाव येथे एका तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची गोपणीय माहिती मिळाली. या नुसार बकाले यांनी तात्काळ दोन पथक रवाना केले.

एका पथकातील सहाय्यक निरीक्षक जालिंदर फळे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, ईश्वर पाटील, विजय चौधरी, हेश महाजन यांचे पथक तपासकामी विदगाव येथे गेले तर पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, सुनील दामोदर, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, विनोद पाटील, मुरलीधर बारी, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख यांचे पथक वरणगाव येथे रवाना झाले.

दोन्ही पथकांनी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत ऑर्डनन्स फॅक्टरी पुलाजवळ संजय गोपाल चंदेले रा.वरणगाव, गजानन शांताराम वानखेडे रा.तरोडा, ता.मुक्ताईनगर, निखिल महेश चौधरी रा.वरणगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १ लाख १४ हजार किमतीचे ४ गावठी पिस्तूल, मॅक्झीन आणि ४ जिवंत काडतूस जप्त केले.

दुसऱ्या पथकाने वैष्णवी हॉटेल विदगाव येथील सागर दिलीप कोळी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील १ गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतूस असा ३३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून एकाच दिवशी ५ गावठी कट्टे हस्तगत करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Protected Content