तेजस भंगाळे यांना कलावंत भूषण पुरस्कार

 

जळगाव : प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवाशी तेजस भंगाळे यांना महाराष्ट्र चित्रपट सेना ( नागपुर) च्यावतीने राजस्तरीय कलावंत भुषण पुरस्कार जाहीर झाला.

 

लवकरच  त्यांना या पुरस्काराने  गौरविण्यात येणार आहे .तेजस भंगाळे सात वर्षांपासून मराठी चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या नाशिक येथे Technoshell Automations  Pvt .Ltd कंपनीत काम करत आहे त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेवून त्यांना कलावंत भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. पराग वाघमारे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तेजस भंगाळे यांना नागपूर येथे पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे..

 

कलावंत भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तेजस भंगाळे यांचे जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे , महापौर जयश्री महाजन , चौधरी , प्रवीण कोल्हे , मयुरी प्रोडक्शनचे दिग्दर्शक सुमित पाचपांडे, सुरेश राजपूत आदींनी अभिनंदन केले आहे.

 

Protected Content