मुंबई विमानतळास नाईक यांचे नाव द्या ; गोर बंजारा ब्रिगेडची मागणी

 

 चाळीसगाव : प्रतिनिधी ।  नवी मुंबई येथील विमानतळास वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गोर बंजारा ब्रिगेडने केली आहे

 

औंढा नागनाथ ( हिंगोली ) येथे    हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या १०८ व्या जयंतीचे औचित्य साधून शाखेचे अनावरण करण्यात आले.  त्यावेळी ही मागणी करण्यात आली

 

गोर बंजारा शिक्षण सेवा अभियान व गोर बंजारा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने लिंबाळा येथे वसंतराव नाईक यांच्या १०८ वी जयंती वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली. गोर बंजारा ब्रिगेड शाखेचे अनावरण  करण्यात आले. नवी मुंबई हे शहर त्यांच्याच संकल्पनेतून उदयास आलेला शहर आहे. त्यामुळे नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळास वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गोर बंजारा शिक्षण सेवा अभियान व गोर बंजारा ब्रिगेड यांनी औंढा नागनाथचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

यावेळी डॉ.मुकेश पवार ,  पंजाब राठोड , ‌गजानन चव्हाण,  अविनाश राठोड,  दुर्गेश जाधव  , सचिन राठोड, विष्णू चव्हाण,  योगीराज राठोड,  गजानन पवार,  सचिन राठोड, गजू पवार, रवी पवार, अमोल जाधव, बाळू जाधव व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. आमची मागणी शासनाने पूर्ण केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विभागीय समन्वयक डॉ. मुकेश पवार,  नकुल जाधव,  रविकांत राठोड व भरत पवार यांनी दिला आहे

 

 

यावेळी  नकुल  जाधव, तांडा समन्वयक गोल्डन राठोड, नयन जाधव, सागर राठोड, राहूल राठोड,  खंडू राठोड व मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते.

 

Protected Content